मोटरसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस; २० मोटर सायकल हस्तगत

नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
मोटरसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस; २० मोटर सायकल हस्तगत

येवला | Yeola

नाशिक जिल्हयासह सिमेलगतचे जिल्ह्यात मोटर सायकल चोरी करून बनावट नंबर प्लेट तयार करून खेडोपाडयांमध्ये विक्री करणार्‍या राँकेटबाबत गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक यांचा पथकाला मिळाली होती.

त्यानुसार (दि.२५) रोजी पथकातील कर्मचारी हे मोटर सायकल चोरणार्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी येवला तालुक्यातील सिमावरती भागात गस्त घालत होते.

दरम्यान गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार येवलाङ्गतालुक्यातील काही संशयीत इसम चोरीच्या मोटर सायकल बनावट नंबर प्लेट लावून विक्री करत असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाली.

त्यावरून पथकाने विखरणी परिसरात सापळा रचून हसन उर्फ गोटया रशिद दरवेशी (वय- 19) यास ताब्यात घेतले. त्याचे घराजवळ लपवून ठेवलेल्या विनानंबर प्लेटच्या मोटरसायकलींबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.

त्यास पोलीसी खाक्या दाखविता त्याने त्याचे मालेगाव येथील साथीदार खलील उर्फ कालू अहमद निहाल अहमद (वय ३७ रा.नयापुरा मुशार्वत चौक, मालेगाव), अनिसु रहेमान अन्सारी (वय ४२, रा. गोल्डन नगर, मालेगाव यांचेसह मालेगाव चांदवड येवला कोपरगाव, अहमदनगर तालुका, पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतून मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.

वरील तीनही आरोपींकडे मोटरसायकल चोरीचे गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे राजस्थान राज्यातील साथीदार रमजान मन्सुरी व सध्या मन्सुरी यांच्या मदतीने नाशिक जिल्हयातील बहुतांश भागामध्ये मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

यातील आरोपी व त्यांचे राजस्थान राज्यातील साथीदार हे विहींरीचे कामासाठी नाशिक जिल्हयातील विविध ठिकाणी वास्तव्यास होते. त्या सर्वांनी मिळून वर्दळीच्या ठिकांणावर पाळत ठेवून मोटरसायकल चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या तिघांकडून 6 बजाज प्लाटीना, 4 हिरो डिलक्स, 2 टिव्हीएस स्पोर्ट, 2 बजाज डिस्कवर, 2 स्पलेंडर, 1 बजाज सी टि 100, 1 हिरो आय स्मार्ट,1 होंडा ड्रिम युगा, 1अ‍ॅव्हिएटर अशा एकुण 20 मोटर सायकल किंमत 4,26,000 चा मुददेमाल हस्तगत केला आहे.

सदर आरोपींनी कबुली दिलेवरून येवला तालुका, आझादनगर, कोपरगाव शहर, अहमदनगर तालुका, पाचोरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे एकुण 07 गुन्हे उघडकीस आलेले आहे.

सदर आरोपींना जप्त मुददेमालासह येवला तालुका पोलीस ठाणे हजर करण्यात आले असुन मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com