वन्यजीव संरक्षण जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली

वन्यजीव संरक्षण जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली

निफाड। प्रतिनिधी Niphad

वन्यजीव सप्ताह Wildlife Week निमित्त येवला प्रादेशिक वनक्षेत्र (नाशिक), नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, वन्यजीव नाशिक व वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था यांचे विद्यमाने गोदाकाठच्या कार्यक्षेत्रात मोटारसायकल रॅली Motorcycle Rally काढून जनजागृती करण्यात आली.

प्रारंभी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी (येवला प्रादेशिक) अक्षय म्हेत्रे, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी मोटारसायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून वनविभागाच्या निफाड येथील रोपवाटिकेतून सुरुवात केली.

यावेळी कोठुरे, करंजगाव, चापडगाव, भुसे, मांजरगाव, खानगावथडी, नांदूरमध्यमेश्वर, तास दिंडोरी, शिवरे आदी गावांमध्ये मानव वन्यजीव सहजिवन, शून्य सर्पदंश अभियान व पक्षी विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी वनविभागाचे वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकांचे गावपातळीवर वाटप करून पक्षांबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीचा समारोप निफाड येथील रोपवाटिकेत करण्यात आला.

या मोटारसायलक रॅलीमध्ये वनसंरक्षक अनिल अंजनगावकर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक विक्रम आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. या रॅलीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, शेखर देवकर, सुनील महाले, बिन्नर, पंकज नागपुरे, राठोड, संदिप काळे, श्रीमती आशा वानखेडे,

गोपाळ हरगावकर, प्रसाद पाटील, जयेश पाटील, धीरज कोकाटे, सुशांत रणशूर, अमोल सोनवणे, महानुभाव गंगाधर आघाव, डॉ.रामनाथ आंधळे, निखिल सालके, अजित कर्पे, मुकेश निकम, मंगेश चारोस्कर, विशाल माळी, पवन नागपुरे, आदित्य आघाव, प्रमोद मोगल, सुनील जाधव, एकनाथ साळवे, सचिन गायकवाड, संजू चव्हाण आदींनी सहभाग नोंदविला.

Related Stories

No stories found.