शहर काँग्रेसतर्फे मोटारसायकल रॅली

भारत जोडो यात्रेचा प्रचार व समर्थन
शहर काँग्रेसतर्फे मोटारसायकल रॅली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) प्रचार व यात्रेचे समर्थन करण्याकरिता नाशिक शहर काँग्रेसतर्फे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीस काँग्रेस कमिटीपासून सुरुवात करून अशोक स्तंभ, रामवाडी, मखरमलाबाद नाका, पेठ फाटा, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा ,मेन रोड मार्गे गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली मार्केट, दूध बाजार, फाळके रोड, चौकमंडई,मोठा राजवाडा, महालक्ष्मी चाळ, द्वारका, सारडा सर्कल ,शालीमार ,सीबीएस मार्गे परत काँग्रेस कमिटी येथे सांगता झाली.

या रॅलीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश पदाधिकारी हेमलता पाटील, मागासवर्गीय विभागाचे सुरेश मारू, राजेंद्र बागुल, बबलू खैरे, हनीफ बशीर,वत्सला खैरे, स्वाती जाधव,आशा तडवी, अण्णा मोरे,गौरव सोनार, इशा कुरेशी,अविनाश गांगुर्डे, संतोष हिवाळे, शब्बीर पठाण, जितू मारू, कमलेश चव्हाण, रतीश मारू, धर्मेश सोलिया, सचिन दीक्षित, धोंडूराम बोडके, धीरज सोलंकी, देवेन मारू, मोईन शेख, कल्पेश केदार, राहुल जाधव, अरुण दोंदे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com