मायलेकीच्या आत्महत्येने हळहळ

मायलेकीच्या आत्महत्येने हळहळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विनयनगर (Vinaynagar) परिसरात माय-लेकीच्या आत्महत्येमुळे (Mother-daughter Suicide) परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता प्रवीण तेजाळे (36, रा. सुखसागर अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 2, बेला पेट्रोल पंपाच्या बाजूला विनयनगर) व त्यांची सात वर्षांची मुलगी अनया प्रवीण तेजाळे या दोघींनी आज (दि.२) रात्री १२ ते दुपारी बारा वाजेच्यादरम्यान राहत्या घरी हॉलमधील छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

त्यांना त्यांचे दीर अशोक मधुकर तेजाळे यांनी एक वाजेच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास मुंबई नाका पोलिस (Mumbai Naka Police) करीत आहेत.

Related Stories

No stories found.