दुर्दैवी घटना : पाय घसरुन विहिरीत पडल्याने मायलेकींचा मृत्यू

दुर्दैवी घटना :  पाय घसरुन विहिरीत पडल्याने मायलेकींचा मृत्यू

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे ( Belgaon Kurhe )

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) पिंपळगाव डुकरा ( Pimpalgaon Dukra )येथे विहिरीत बुडून (Drown in a well) कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ (Shepherd)करणाऱ्या मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे.

येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातील मोकळ्या पडीत भरलेल्या विहीरीत आज गुरुवारी साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर वय (35) वर्षे मोनिका राजेंद्र गोयकर(15) वर्षे ह्या दोघी मायलेकींचा बुडून मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. तिच्या मुलाने सर्व बघितल्याने त्याने गावातील लोकांना मदतीसाठी बोलवले. त्यानंतर परिसरातील लोक जमा झाले माजी पोलीस पाटील कचरू वाकचौरे यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला ( Vadivrahe Police Station ) कळविले.

यावेळी पोलीस हवालदार विलास धरणकर यांनी राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त गोविंद तुपे यांना बुडालेले मृतदेह काढण्यासाठी बोलवले. त्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन मायलेकीना विहिरीतुन बाहेर काढले.

यावेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माय लेकीचे मृतदेह पंचनामा करण्यासाठी घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी पोलीस राजु पाटील, विलास धारणकर मौले. आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com