
वणी | वार्ताहर | Vani
आईने मुलीची जीवनयात्रा संपवत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना वणी येथे घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सविता विकास कराटे (33 रा. कृष्णगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या महिलेने माहेरी मोठा कोळीवाडा वणी येथे राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
तसेच तनुजा विकास कराटे (दिड वर्ष रा. कृष्णगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) स्वतःच्या मुलीला स्कार्पच्या सहाय्याने गळफास लावून जिवे ठार मारले. याबाबत वणी पोलिसांत उत्तम पुंडलीक इंगळे (रा. मोठा कोळीवाड वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी भा. दं. वि. कलम 302 प्रमाणे वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण ऊदे, साहेबराव वडजे, किरण धुळे, हरिश्चंद्र चव्हाण करीत आहे.