Nashik : आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

Nashik : आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

नाशिक | Nashik

शहरातील द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर (Dwarka-Adgaon Flyover) आयशर-कंटेनरमध्ये भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

Nashik : आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू
सिन्नर : तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघे जखमी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर एक आयशर हा बंद अवस्थेत उभा होता. यावेळी इगतपुरीहून धुळ्याच्या (Igatpuri to Dhule) दिशेने जाणाऱ्या कंटेनरने आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनर चालकासोबत ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला.

Nashik : आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू
मैं निकला गड्डी लेके...; राहुल गांधींची ट्रकने सवारी, Video Viral

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे (Panchvati Police Station) पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघाताचा पुढील तपास सुरु केला. तर जखमी कंटेनर चालकाला पुढील उपचारासाठी (Treatment) खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com