दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 'व्हॉटस्‌ॲप’चा सर्वाधिक वापर

लॉकडाऊन काळात प्रश्न, गृहपाठासाठी 'युजफुल'
दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 'व्हॉटस्‌ॲप’चा सर्वाधिक वापर

नाशिक | Nashik

जवळपास १२ हजार २९८ शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन यापूर्वीच केले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, गृहपाठ व्हॉटस्‌ॲपद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्याचा पर्याय सर्वाधिक वापरला गेला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ‘दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयारी आहेत का!’ हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण हाती घेतले होते.

याअंतर्गत राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन केले, हे देखील जाणून घेण्यात आले. यात शाळांनी ऑनलाइन टेस्ट, व्हॉटस्‌ॲप, ऑनलाइस सेशन, ऑफलाइन टेस्ट, गृहभेटी, वर्क बूक आणि अन्य पर्याय वापरले आहेत. त्यातील बहुतांश शाळांनी व्हॉटस्‌ॲप, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, वर्क बुक असे बहुपर्याय वापरून मूल्यमापन केल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

२५ हजार ९२७ शाळांपैकी ४९.८७ टक्के म्हणजेच १२ हजार ९३१ शाळा सर्वेक्षणात सहभागी झाल्या आहेत. यात सर्वाधिक शाळांनी व्हॉटस्‌ॲपचा वापर केल्याचे दिसून आले. जवळपास १२ हजार २९८ शाळांनी व्हॉटस्‌ॲपचा, तर नऊ हजार ९३० शाळांनी ऑफलाइन आणि नऊ हजार ७५८ शाळांनी ऑनलाइन टेस्टचा वापर केला आहे.

करोना काळातही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाणही उल्लेखनीय आहे. तब्बल सात हजार ३५२ शाळांमधील शिक्षकांनी गृहभेटीद्वारे विद्याथ्यांचे मुल्यमापन केले आहे. तर आठ हजार ४०२ शाळांनी विद्यार्थ्यांना वर्क बुक देऊन त्या भरवून घेतल्या.

सहभागी एकूण शाळा : २५,९२७

सर्वेक्षणात माहिती दिलेल्या शाळा : १२,९३१

शाळांनी वापरलेले पर्याय :१- अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत

२- शाळांची संख्या (एका शाळेने मूल्यमापनासाठी एकापेक्षा जास्त पर्यायही वापरले)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com