नाशिकमधील 'या' आठ तालुक्यांत होतोय करोनाचा उद्रेक; आदिवासी बहुल भाग आटोक्यात

नाशिकमधील 'या' आठ तालुक्यांत होतोय करोनाचा उद्रेक; आदिवासी बहुल भाग आटोक्यात

नाशिक | प्रातिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांत करोनाचा उद्रेक (Corona Outbreak) झालेला बघायला मिळत आहे. यामध्ये निफाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण करोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आदिवासी बहुल (Tribal Area) असलेल्या नाशिकमधील तालुक्यांत मात्र करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे...

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यत जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ५५२, चांदवड १ हजार ४८६, सिन्नर १ हजार ४९२, दिंडोरी १ हजार ११८, निफाड २ हजार ९०७, देवळा १ हजार ३३, नांदगांव ८३०, येवला ५९१, त्र्यंबकेश्वर ३५०, सुरगाणा ३०६, पेठ १४३, कळवण ५८३, बागलाण १ हजार ३६०, इगतपुरी ४३३, मालेगांव ग्रामीण ७६७ असे एकूण १४ हजार ९५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ४२४ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९१८ तर जिल्ह्याबाहेरील १७४ असे एकूण ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ७७० रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी अशी

नाशिक ग्रामीण ८१.५० टक्के

नाशिक शहर ८५.७९ टक्के

मालेगाव ७९.१६ टक्के

जिल्हा बाह्य रुग्ण ९२.६७ टक्के

संपूर्ण जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.३० इतके राहिले आहे.

आतापर्यतचे मृत्यू असे

नाशिक ग्रामीण : १ हजार २५९

नाशिक महानगरपालिका क्षेत्र १ हजार ३५७

मालेगांव महानगरपालिका क्षेत्र २२९

जिल्हा बाहेरील रुग्ण ९०

२ लाख ६३ हजार ७७० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख २२ हजार ३६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ४६७ पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.३० टक्के.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com