नवीन नाशकातील मनपा रुग्णालय रामभरोसे

प्रभाग सभापतींकडून दुरवस्थेची पाहणी
नवीन नाशकातील मनपा रुग्णालय रामभरोसे

नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik Road

अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणारी आरोग्य यंत्रणा (Health system) सुव्यवस्थित असावी याबाबत शासनाचे नियम असताना नवीन नाशकातील (Navin Nashik) मोरवाडी येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचा (Shri Swami Samarth Hospital) कारभार रामभरोसे सुरू आहे. प्रभाग सभापती सुवर्णा मटाले (Ward Chairperson Suvarna Matale) यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता डॉक्टरच गैरहजर असल्याचे आढळले.

नवीन नाशकात सुमारे पाच लाखांच्या लोकसंख्येसाठी मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावते. या भागातील गरीब, कामगार व सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यांना योग्य वेळी योग्य उपचार व सल्ला (Treatment and counseling) मिळणे अपेक्षित असताना येथे डॉक्टर उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप येथील नगरसेविका किरण दराडे यांनी केला आहे. त्यांनी स्वतः आठवडाभर रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.

काही रुग्णांशी चर्चा केली. यावेळी अनेक वेळा हा प्रकार समोर आला. करोनानंतर डेंग्यू (Dengue), चिकन गुनिया (Chicken guinea) व इतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असायला हवी. मात्र येथील डॉक्टरच वेळेवर उपस्थित राहत नसतील, रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयाबाबत कायम तक्रारी (Complaints) येतात.

याबाबत शिवसेनेने आंदोलनही केले होते. येथील आरोग्य यंत्रणेबद्दल नेहमीच ओरड असते. लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिक तक्रारी करत असतात. डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्यानंतर येथील एकाही आरोग्य अधिकार्‍याने कामाची चुणूक दाखवली नाही. त्यामुळे येथे सक्षम अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

नवीन नाशिक प्रभाग सभापती सुवर्णा मटाले यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी दौरा केला. यावेळी मुख्य अधिकारी यांच्यासह इतर डॉक्टर्स उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली. यावेळी सर्वच कारभार रामभरोसे असल्याचे समोर आल्याने सभापती मटाले यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे रुग्णांचे हाल होत आहेत. साथीच्या आजारात वाढ होत असताना असा बेजबाबदारपणा योग्य नसल्याने आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती मटाले यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नवीन बाजी हे एका किरकोळ कागदावर रजेचा अर्ज देऊन निघून गेले होते. रजा घेताना ती मंजूर झाल्याशिवाय किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय जाता येत नसतानाही डॉ.बाजी निघून गेल्याने त्यांचा बेजबाबदारपणा व मनमानी कारभार समोर आला. शिवाय त्यांच्या जागेवर प्रभारी डॉक्टर असणे आवश्यक असताना तशी नेमणूक करण्यात आली नव्हती. यामुळे डॉ.बाजी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर मी स्वतः येथे येऊन पाहणी केली. अचानक भेट दिली. यावेळी येथील बेजबाबदारपणा दिसून आला. येथील जबाबदार आरोग्य आधिकारी डॉ. बाजी हे मनपाचे मुख्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांची रितसर परवानगी न घेता रजेवर गेले. सर्व प्रकारावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच आयुक्तांकडे रुग्णालयाबाबत तक्रार करणार आहे.

- सुवर्णा मटाले, नवीन नाशिक प्रभाग सभापती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com