नाशिक । Nashik

दिवाळी होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला असून जिल्ह्यातील दोन लाख चार हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदती पासून अद्याप वंचित आहे.

३ लाख ६६ हजार शेतकर्यांपैकी फक्त १ लाख ६२ हजार शेतकर्यांच्या खात्यावरच अतिवृष्टीची मदत जमा झाली असून उर्वरीत नूकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यासाठी जिल्हाप्रशासनाला शासनाकडून १३२ कोटींचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही.

जून व जुलै महिन्यात पाठ फिरवणार्या पावसाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. नाशिक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी अनेक पिकांना अतिवृष्टिचा जोरदार तडाखा बसला. कांदा, मका, भात, ज्वारी, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे आडवी झाली.

त्याचे बरोबर भाजिपाल्याहि फटका बसला. एकूणच हातातोंडाशी आलेले पिक आडवे झाल्याने शेतकरी संकटात सापडला. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण करुन हेक्टरी दहा हजार व फळबागांना २५ हजार मदत जाहिर करत दिवाळीपुर्वी शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाइल, असे आश्वासन दिले होते.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकर्यांचे नूकसान झाले. जिल्हाप्रशासनाने पंचनामे पूर्ण करत नूकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटीची मदत जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. एक लाख ६२ हजार शेतकर्यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली. मात्र, एक महिना लोटला तरी शासनाकडून अद्याप उर्वरीत १३२ कोटिंची मदत मिळणे बाकी आहे.

दोन लाख चार हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. मदतीपासून वंचित रहावे लागल्याने नूकसानग्रस्त शेतकर्यांची दिवाळी कडुच गेली. करोना संकटामुळे सरकारी तिजोरित खडखडाट असल्याने मदत प्राप्त होण्याद विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.