बापरे! नाशकात आजही करोनाबाधितांची हजारीपार; कोविड सेंटर उपचारासाठी सज्ज

बापरे! नाशकात आजही करोनाबाधितांची हजारीपार; कोविड सेंटर उपचारासाठी सज्ज
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार ४७ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर १६६ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १ हजार ४७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) ६०५, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ३४९, मालेगाव (Malegaon) मनपा विभागात ३१ तर, जिल्हाबाह्य ६२ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दोन करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील एक रुग्ण नाशिक मनपा तर एक ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७६५ इतकी आहे.

दरम्यान शनिवार (दि. ०८) जिल्ह्यात १ हजार १०३ नवे करोनाबाधित आढळले होते. काल (दि. ०९) १ हजार ५६ नव्या रुग्ण नोंदवले गेले आहेत. आज (दि. १०) १ हजार ४७ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सलग तिसऱ्या दिवशीदेखील हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात सातत्याने करोनाचा रुग्णांचा आलेख वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान नाशिक मध्ये १३ हजारांच्या आसपास बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात ऑक्सिजनचे ४ हजार ९३६ बेड, व्हेंटिलेटरचे १ हजार २१९ बेड तर आयसीयूच्या १ हजार ४ बेडची सज्जता ठेवली आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. करोनाचा वाढता आलेख असाच सुरू राहिला तर अजून कडक निर्बंध लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Stories

No stories found.