दिवसाला आठ हजारांहून अधिक करोना चाचण्या

जिल्हाधिकारी : ९० टक्के रुग्ण शहरी भागात
करोना अपडेट
करोना अपडेट

नाशिक । Nashik

जिल्ह्यात आढळणार्‍या करोना पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे महापालिका हद्दितील आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ट्रेसिंग वाढविण्यासाठी ३०५० वरून ८००० पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

करोना आढावा बैठकित ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व लॅब मिळून साधारण २१ हजार नमुने तपासणीची क्षमता तयार करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या १० हजार ८५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी ८० टक्के रुग्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात असून १८ टक्के रुग्ण ग्रामीण भागात आहेत तर मालेगावमध्ये ७१६ रुग्ण आहेत. यातील साधारण ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात असून या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, या शहरांच्या खालोखाल सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात अ‍ॅक्टिव रूग्ण आहेत असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचा मृत्यूदर सद्यस्थितीत अत्यंत कमी झाला असून तो सध्या १ टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी

ऑक्सिजन पुरवठा, रेमडिसिव्हर, व्हेंटीलेशन बेड आदी पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

जिल्हा रुग्णालयात २० किलोलिटर ऑक्सिजन टँक रविवारपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच ट्रेसिंग वाढविण्यात आले असून त्यासाठी ३०५० वरून ८००० पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आसल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रेसिंगसाठी ३० पथकांची नियुक्ती

शहरातील रुग्णसंख्या व गृहविलगीकरणाचे प्रमाण लक्षात घेता कॉन्टक ट्रेसिंग, आणि टेस्टिंग करण्यासाठी महानगरपालिका पातळीवर ३० पथके तयार करण्यात आली आहेत.

या पथकांच्या मदतीने गृहविलगीकरणातील रुग्णांच्या

हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणे, रुग्णांच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गृहविलगीकरण्याच्या नियमांची माहिती दिली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com