महाटीईटी परीक्षेला ८५ टक्यांंहून अधिक उपस्थिती

महाटीईटी परीक्षेला ८५ टक्यांंहून अधिक उपस्थिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) TET Exam परीक्षार्थ्यांचा चांंगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही पेपरला ८५ टक्यांंहून अधिक उपस्थिती होती. परंतु काही परीक्षार्थींना पाच-दहा मिनीटे उशीरा आल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यामूळे अशा परीक्षा केंद्रांवर तणाव दिसला. जिल्ह्यात Nashik District ४३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत झाली.

पेपर क्रमांक एकसाठी १५ हजार १४४ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १३ हजार ०१६ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर दुपारच्या पेपर क्रमांक दोनला १३ हजार ५७७ परीक्षार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ११ हजार ९२५ जणांनी पेपरला हजेरी लावली.

दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यात पेपर क्रमांक एक हा सकाळच्या सत्रात तर पेपर क्रमांक दोन हा दुपारच्या सत्रात पार पडला. पहिल्या सत्रातील परीक्षेत शहरातील काठे गल्ली परीसरातील रविंद्र विद्यालय, तसेच पंचवटीतील उन्नती विद्यालय, गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलसह कॉलेजरोडवरील काही शाळांच्या केंद्रांवर परीक्षार्थी उशीराने आलेल्या प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांकडून अथ्थक प्रयत्न करुनही त्यांना परीक्षा केंद्रात जाता आले नाही.

दरम्यान दुसऱ्या सत्रातील परीक्षेत बहुतांश परीक्षार्थी वेळेवर हजर होते. परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. याशिवाय गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केलेली होती. काही केंद्रांवर प्रवेश नाकारल्याच्या घटना वगळता, उर्वरित परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याचे शिक्षण विभागाने सांगितलेे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com