करोनाचा उद्रेक! जिल्ह्यात आढळले तीनशेहून अधिक रुग्ण

करोनाचा उद्रेक! जिल्ह्यात आढळले तीनशेहून अधिक रुग्ण
करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोनाचा उद्रेक दिसून येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात 322 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर 109 रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात 322 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) 276, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात 32, मालेगाव (Malegaon) 02 तर जिल्हाबाह्य 12 रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एक करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा रुग्ण नाशिक ग्रामीणमधील होता. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 759 इतकी आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तीन दिवस जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या शंभरीपार गेली होती. काल 216 नवे करोनाबाधित रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले होते. मागील चोवीस तासात 322 नवे करोना रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, करोना बाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com