प्रभाग 1 मध्ये विकासाच्या बर्‍याच संधी

प्रभाग 1 मध्ये विकासाच्या बर्‍याच संधी

पंचवटी । वार्ताहर Panchvati

मेरी-म्हसरूळ प्रभाग 1 ला माजी महापौर, सलग दुसर्‍यांदा स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते पदाची लॉटरी लागली, मात्र विकासाच्या नावाचा फुसका बार.

रस्त्याची दुरवस्था

किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ - हॉटेल राऊ लिंकरोड, मेरी वसाहत, कॉलनी परिसर, मळे परिसर

उद्यानांची दुरवस्था : प्रभागातील अनेक भागात उद्याने असताना त्यांची देखभाल होत नाही. लहान मुलांसाठी खेळणी नाही, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅकची

दुरवस्था, फुलझाडांचा अभाव.

साथीच्या आजारांत वाढ : डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यांसारख्या आजारांची साथ सुरू असताना अनेक भागात धूर, औषध फवारणी होत नाही.

पाणी : कमी दाबाने पाणी येते. काही भागात पहाटे लवकर पाणी येत असल्याच्या तक्रारी.

पथदीप : मळे परिसराला नवीन पथदीपांची प्रतीक्षा, बहुतांश प्रभागात एलईडी लाईटची प्रतीक्षा.

म्हसोबावाडीसारखी झोपडपट्टी विकासापासून अजूनही वंचित आहे. म्हसरूळ गावातील पुरातन सीता सरोवर विकासाच्या

प्रतीक्षेत आहे. म्हसरूळमधील अमरधामची दुरवस्था, सुविधांचा अभाव. शासनाच्या लसीकरण मोहिमेत वशिलेबाजी होत असल्याचा आरोप.

मेरी - म्हसरूळ परिसरामध्ये विकासाच्या अजून बर्‍याच संधी आहेत. अजून आपण मूलभूत सोयीसुविधांसाठीच संघर्ष करतोय; परंतु नवीन पिढीला मूलभूत सुविधांपलीकडे जाऊन त्यांचे दैनंदिन जीवनमान कसे उंचावेल यावर विकासात्मक आणि सकारात्मक चर्चा हवी आहे.

- प्रवीण रमेश जाधव

प्रभाग 1 मधील सर्व लोकप्रतिनिधींना महापालिकेत काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली, तरीही 15/20 वर्षांपूर्वीच्या समस्या येथे आहेत. रस्त्याची दुरवस्था, पाण्याची अडचण, बकाल झालेले गार्डन, आरोग्याबाबत असलेली उदासीनता, गावठाण भागाकडील दुर्लक्ष अशा अनेक समस्या प्रभागात आहेत. लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत फक्त सुडाचे राजकारण केले. त्यांनी विकासाचे राजकारण केले असते तर आनंद वाटला असता.

- सुनील निरगुडे

Related Stories

No stories found.