पुनदखोरे । वार्ताहर | Punadkhore
अण्णा हजारेप्रणीत (Anna Hazare) भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या (Anti-Corruption People's Movement Trust) कळवण (kalwan) तालुकाध्यक्षपदी कळवण येथील
दत्तात्रय निंबाजी मोरे (Dattatraya Nimbaji More) यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दौंडे (Nashik District President Balasaheb Daunde) यांनी नाशिक (nashik) येथील कालिका देवी मंदिर ट्रस्ट (Kalika Devi Temple Trust) येथे झालेल्या बैठकीत दिले.
बैठकीस उपजिल्हाध्यक्ष विष्णू साबळे, येवला तालुकाध्यक्ष मोहन कुंभारकर, निफाड तालुकाध्यक्ष उत्तम जगताप, चांदवड तालुकाध्यक्ष शिवाजी दौंडे , मालेगाव तालुकाध्यक्ष हरीश मारू, सिन्नर तालुकाध्यक्ष सोमनाथ आव्हाड, दिंडोरी तालुकाध्यक्ष प्रभाकर खराटे, नांदगाव तालुकाध्यक्ष भीमराव लोखंडे, देवळा तालुकाध्यक्ष मयूर आहेर आदी उपस्थित होते. मोरे यांची निवड झाल्याबद्दल विजय जाधव, विजय चव्हाण, विजय भामरे, नाना ठाकरे आदींसह मोरे यांचे सदस्यांनी अभिनंदन केले आहे.