युवती आत्महत्याप्रकरणी आज मोर्चा

युवती आत्महत्याप्रकरणी आज मोर्चा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील संजीवनी नगर Sanjivani Nagar भागात राहणार्‍या युवतीने गुरुवारी (दि.30) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या Suicide Case केल्यानंतर तिच्या तोंडावाटे येणार्‍या फेसाने आत्महत्येबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लव्ह जिहादचा संशय व्यक्त करीत पोलिस निरिक्षकांना निवेदन देत घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज(दि.7) दूपारी 12 वाजता वावी वेस येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.

पोलिसांनी संंशयीतास अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवल्याचा आक्षेप घेत सर्वपक्षीय कार्यकर्ते संतप्त झाले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा सर्वपक्षियांनी दिला.

राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे या पक्षांसह वंजारी समाज फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, पीडितेला न्याय मिळायलाच हवा, प्रकरणाची सखोल चौकर्शी होऊन संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्र्यंबकेश्वर येथील पंडित मयुरेश दीक्षित यांनी म्हटले आहे.

पोलिस अधीक्षकांनाही निवेदन पाठविण्यात आले. या प्रकरणात रईस इब्राहिम शेख, रा. विजयनगर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करून न्याय मिळण्याची मागणी निवेदनात करण्यात आल्यानंंतर संशयित आरोपीस अटक करण्यात आली. रईस नेहमी भेटायला येत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांचे म्हणणे असून अनेकदा टोकल्यानंतरही त्याचे येणे-जाणे सुरूच होते.

निवेदनावर भाजपचे जयंत आव्हाड, रमेश नागरे, भाऊसाहेब शिंदे, वंजारी समाज फाउंडेशनचे कृष्णा दराडे, राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, काँग्रेसचे विनायक सांगळे, मंगला झगडे, उर्मिला लासुरकर, रूपा काळे, कुणाल हांडे, रोहिणी कुरणे, सुमन जोशी, मोशीर शेख आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

रास्ता रोको होणार

या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.7) बसस्थानकापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. बसस्थानकाजवळ रास्ता रोको देखील करण्यात येणार असल्याची माहिती जयंत आव्हाड, विनायक सांगळे, भाऊसाहेब शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com