शेतकरी संघटनेचा वीजवितरणवर धडक मोर्चा

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe sukene

नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने (Nashik District Farmers Association) महावितरणच्या (MSEDCL) मनमानी कारभाराविरुद्ध ओझर (Ozar) येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. ऐन रब्बी हंगामात (Rabbi season) शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम महावितरणकडून सुरू असल्याने जिल्हा शेतकरी संघटनेने महावितरणला कायदेशीर दणका दिला आहे.

तालुक्यातील ओझर व परिसरातील डिपी बंद करण्यात आल्या असून दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) मोहाडी (mohadi), जानोरी (janori) परिसरातील वीजपुरवठा (Power supply) देखील खंडित केल्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे (arjun borade) व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संतू बोराडे, केदू बोराडे यांच्या नेतृत्वाखाली ओझरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचे महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी डोंगरे यांनी शेतकर्‍यांना रितसर नोटीस न देता शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला.

आपण वीजपुरवठा खंडित करू शकत नाही. जोपर्यंत डिपी चालू होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी उठणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी जिल्हा शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली. दोन वर्षांपासून करोना व नैसर्गिक आपत्तीत शेतकरी हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत महावितरणने बील दुरुस्ती करून द्यावी. एक एकर व पाच एकर जमीन असलेल्या शेतकर्‍यांना अंदाजे सारखे बील दिले असून हा घोळ मिटवा.

आम्ही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सर्व शेतकर्‍यांना बील भरायला सांगतो अशा आवाहनानंतर एक तासात सर्व डिपी चालू करण्यात आल्या व त्यानंतर महावितरणचे कार्यालय शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोडले. शेतकरी संघटनेच्या दणक्याने खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने ओझर, दीक्षी, दात्याणे थेरगाव परिसरातील शेतकरी व व्यवसायिकांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com