हक्कांच्या घरांसाठी मोर्चा

हक्कांच्या घरांसाठी मोर्चा
Dipak

सटाणा | प्रतिनिधी Satana

शहरातील विविध भागात आदिवासी (Tribal) बांधव झोपड्यांमध्ये राहत असून त्यांना नगरपालिका प्रशासनाने (Municipal administration) हक्काची जागा देऊन घरकुले द्यावीत, या मागणीसाठी शहरातून आदिवासींनी भाजपच्या (bjp) नेतृत्वात मोर्चा काढला त्यानंतर पोलिस परेड मैदानावर (Police Parade Grounds) आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

शहरातील सुकड नाला, बस स्थानकमागील इंद्रप्रस्थ कॉलनी, चौगाव बर्डी, आराई पांदी आदी परिसरात आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून झोपडीपट्टीत राहत आहेत. नगरपरिषदेने हक्काचे घरे देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येक झोपडी धारकांकडून 300 रूपये वसूली केल्याचा आरोप करीत, संबंधितांना अद्याप हक्काची घरे मिळाली नाहीत.

पालिकेने घरे बांधून द्यावीत सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणी साठी संतप्त आदीवासी बांधवांनी शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदीरापासून (Devmamaledar Yashwantrao Maharaj Temple) शिवतीर्थ, विंचूर प्रकाशा महामार्गावरुन तहसिलदार कार्यालयावर मोर्चा गेला. मोर्चाचे नेतृत्व भाजपा शहराध्यक्ष राहुल सोनवणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरणार व मोर्चातील काही प्रतिनीधींची तहसिलदार जितेंद्र इंगळे याची भेट घेत चर्चा केली तहसीलदार इंगळे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल,

पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार व वनविभागाचे अधिकारी व इतर अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काण्याचा प्रयत्न केला. मात्र सटाणा नगर पालिकेच्या (Satana Municipality) सूत्रांनी कोणतीही शासकीय जागा अथवा पोटखराबा असलेली जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. यावर आंदोलन (agitation) करत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जोपर्यंत आदीवासी बांधवांना घरकुल बांधण्यासाठी पालिका प्रशासन जागा देतनाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेऊन उपोषण कत्यांनी पोलिस परेड मैदानावर ठाण मांडले.

यावेळी आंदोलन कत्यांना मोर्चाचे नेतृत्व करणारे राहुल सोनवणे, मंगश खैरणार, भास्कर सोनवणे,आनिल सोनवणे यानी मार्गदर्शन केले. आंदोलनात शाम लोखंडे, गिरीष कुवर, राजेंद्र माळी, रमेश माळी, अशोक नवरले, उमाजी गायकवाड, रोशन माळी, सुरेश बोरसे, बबन पवार, अनिल पवार, रामु बागुल, मार्कंड चव्हाण, मधुकर गायकवाड, रत्नाबाई पवार, बायटाबाई गायकवाड, लताबाई पवार, अनुबाई गवळी, केवाबाई पवार, आवळाबाई मोरे, गवलाबाई गायकवाड यांनी केले. या मोर्चात आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com