नाशकात लवकरच लोकराजा शाहू महाराजांचे स्मारक उभारणार

महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती
नाशकात लवकरच लोकराजा शाहू महाराजांचे स्मारक उभारणार

नाशिक | Nashik

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Lokraja Chatrapati Shahu Maharaj) यांचे नाशिक शहरात स्मारक (Monument) उभारणार, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी (Mayor satish Kulkarni) यांनी दिली.

आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर बोलत होते. त्यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने लोकराजा असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाशिक (Nashik city) शहरात स्मारक उभारणे गरजेची बाब असून आज मितीस लोक कल्याणकारी राजा कसा असावा याचे चिरंतन स्मरण होण्यासाठी अतिशय देखणे व भव्य स्मारक उभारण्याची गरज आहे असे सूतोवाच केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवले व त्यानंतर त्यांचा वसा पुढे चालु रहावा, याकरिता खऱ्या अर्थाने हे हिंदवी स्वराज्य लोककल्याणकारी असावे, याकरिता छत्रपती शाहू महाराजांनी आटोकाट प्रयत्न केले.

अशा लोककल्याणकारी राजाचे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक होणे हे नाशिक शहराच्या दृष्टिकोनातून भूषणावह आहे. या करिता शहरात छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

यासाठी शहरात योग्य जागा निश्चित करून स्मारक उभारण्यात येईल व त्यासाठी आवश्यक असलेला निधी हा चालू अर्थसंकल्पामध्ये (Academic Budeget) तरतूद धरण्यात येऊन स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या (Shahu Maharaj Jayanti) निमित्ताने जाहीर केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com