अन्न पाण्यासाठी माकडे गावाकडे; वनविभागाकडून पाणवठ्यात पाणी

अन्न पाण्यासाठी माकडे गावाकडे; वनविभागाकडून पाणवठ्यात पाणी

येवला । सुनील गायकवाड | Yeola

येवला तालुक्यातील (yeola taluka) अंकाई किल्ला (Ankai Fort) व परिसरातील गावाभोवती माकडांचे कळप (herd of monkeys) डोंगरात पाण्याची चणचण भासताच गावाकडे कूच करत आहे.

मात्र वनविभागाने (Forest Department) या प्राण्यासाठी पाण्याची सोय (Water supply) व्हावी म्हणून काही पाणवठे तयार केले आहेत, तर काही ठिकाणी सिमेंटच्या टाक्या (Cement tanks) ठेवून पाण्याची सोय केली असली तरी ही सोय फक्त फोटो काढण्यापूरतीच असल्याचे निदर्शनास येत आहे.

वन विभाग (Forest Department) दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वनचर, सारखे वॉटर हॉल, वनराई बंधारे, दगडी बांध यासारखे पाणी अडवण्याचे उपक्रम राबवत असते. परंतु पूर्वी अस्तित्वात असलेले वनराई बंधारे, नाला बांध आज गाळाने व्यापलेले आहे. त्यांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात असतांनाही या मध्ये पाणी साठले जात नाही. हे वनराई बंधारे सपाट झाले आहेत.

त्यामुळे पावसाचे पाणी अडवले जात नाही. या पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. यामुळे उन्हाची लगबग सुरु होताच पाण्याची चणचण भासत आहे. यामुळे वन्यप्राणी (Wildlife) लोकवस्तीकडे धाव घेत आहे. डोंगरात माकडं बरोबरच खोकड, ससा, मोर, रान डुक्कर, लांडगे यासारखे प्राणी डोंगरामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न (water isue) भेडसावत या वन्य प्राण्यांचे प्रचंड हाल होतात.

आज छोट्या मोठ्या कुंड्या वन विभागाच्या मार्फत प्राण्यासाठी ठेवल्या जातात. तर कृत्रिम पाणवठेही तयार केले जातात.परंतु तरीही प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com