शालेय पोषण आहाराचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर
संग्रहित

शालेय पोषण आहाराचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर

उन्हाळी सुटीतील पोषण आहारावर तोडगा

नाशिक । Nashik

उन्हाळ्यात शाळांना सुटी (Summer Schools Holidays) असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप (Allocation of nutritious food) करणे बंधनकारक आहे. यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वाटप करण्यात आले.

मात्र, उन्हाळ्यात धान्य वाटपही शक्य झाले नाही त्यामुळे भारत सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२०२२ च्या शैक्षणिक वर्षांची उन्हाळी सुटीसाठी (Summer vacation) विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे (School nutrition diet) वाटप थेट न करता विद्याथ्र्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या (Benifit Transfer) माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे.

यामुळे या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते (New Bank Accounts) 'उघडण्यात यावे. बँक खाते आधार लिंक (Adhar bank Linked) आहेत किंवा नाहीत, लिंक नसल्यास आधार लिंक करावेत, तसेच विद्यार्थ्यांची बँक खाते उघडली नसल्यास त्यांचे आधार लिंक खाते उघडण्याचे आदेश शाळांना शिक्षण संचालनालयांनी दिले आहेत.

राज्यातील प्राथमिक, (Primary Schools) उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आधार लिक बॅक खाते उघडण्याबाबत शाळांनी हालचाली कराव्यात तसेच १ जुलै, २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी, व बँक खाते उघडण्याकरीता पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत. ऐन लॉकडाउनच्या (Lockdown Period) काळात विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचीही तक्रारी आहेत.

असे दिले जाते धान्य

रविवार आणि सुट्यांचे दिवस वगळून

पहिली ते पाचवी प्रती दिन

तांदूळ

१०० ग्रॅम

डाळ/कडधान्य

२० ग्रॅम

तेल

०५ ग्रॅम

मसाले व इतर

०२ ते ०५ ग्रॅम

भाजीपाला

५० ग्रॅम

सहावी ते आठवी प्रती दिन

तांदूळ

१५० ग्रॅम

डाळ/कडधान्य

3० ग्रॅम

तेल

७.५ ग्रॅम

मसाले व इतर

०३ ते ०७ ग्रॅम

भाजीपाला

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com