पाऊले चालती, ‘हायस्पीड’ची वाट!

पाऊले चालती, ‘हायस्पीड’ची वाट!

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी (Nashik-Pune High Speed Railway) केंद्र सरकारने (Central Government) प्रस्तावास मान्यता दिली...

या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर (Nashik-Pune-Ahmednagar) जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने या शहरांच्या विकासात आर्थिक भर पाडणार आहे.

235 कि. मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासांत नाशिक ते पुणे (Nashik to Pune) प्रवास पूर्ण होणार आहे.

हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून, या द्रृतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरू करण्यात येत आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग (Nashik-Pune semi high speed railway line) हा देशातील पहिलाच मार्ग असेल व यासाठी 16 हजार 39 कोटी रुपये खर्च आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जिल्हाधिकारी सूरज मांढरे (suraj mandhare), महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी (Sachin Kulkarni), उपजिल्हाधिकारी वासंती माळी (Vasanti Mali) आदींची बैठक नुकतीच झाली.

त्यात 235 कि. मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात नाशिक -पुणे हा प्रवास पूर्ण होणार असल्याचे चित्र रंगविण्यात आले. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे.

ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाईनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ आहे. या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

भूसंपादनासह हा प्रकल्प सन 2024 पर्यंत म्हणजे साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रतितास 200 किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. नाशिक-पुणे-अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहेच. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.

प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे (Semi high speed railway) चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे तिन्ही जिल्ह्याचा विकास होणार असून, कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे.

त्याचबरोबर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर थेट वाटाघाटीतून जमीन संपादन केली जाणार आहे. या तिन्ही जिल्ह्यातून 101 गावांमध्ये 1300 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे.

पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतुकीशी जोडला जाणार आहे.

नाशिकरोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पळसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभीरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा 14 स्थानकांचा समावेश आहे.

बागायती क्षेत्राचे भूसंपादन

मौजे नाणेगाव (जिल्हा नाशिक ) येथे भूसंपादन हे गावातील 21.5 हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात.

या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून बाधित शेतकर्‍यांची जमीन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कुटुंबातील एकाला नोकरी हवीच

रेल्वेलाईनमुळे शेतकर्‍यांच्या क्षेत्राची दोन ते तीन तुकड्यांत विभागणी होणार असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राची संंमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरित संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणार्‍या पाईपलाईन 25 मीटरवर क्रॉसिंग होण्याकरीता व्यवस्था असावी. पाईपलाईन विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा.

बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्या शेतकर्‍यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या क्षेत्राच्या व्यतिरिक्त रेड झोन नसावा, गावातील रेल्वेमार्गातील बाधित होणारे वागवहीवाटीचे रस्त्यांना क्रॉसिंग येणे जाण्याची योग्य ती व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या या भागाताल प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. त्यातून सन्मानीय मार्ग निघाला तर विकासाचा आनंदच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com