साहित्य धुरा पेलण्यास युवा पिढी सक्षम

साहित्य धुरा पेलण्यास युवा पिढी सक्षम

नाशिक | शुभम धांडे | Nashik

नाशिक (Nashik) ही सारस्वतांची भूमी आहे. तिला साहित्याची (Literature) मोठी परंपरा आहे. त्यामागे नाशिकच्या अनेक साहित्यिक, कलाकार यांचे श्रम आहेत...

ज्यामध्ये कुसुमाग्रज, कानेटकर, सावरकर यांच्या लेखनाने नाशिकसह संपूर्ण साहित्यक्षेत्राला एक वेगळीच ओळख दिली आहे. त्यात तात्यासाहेबांच्या रूपाने मिळालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार ही खूप मोठी देण आजही तितकीच ताजी आहे.

स्वातंत्रवीर सावरकरांनी (Vinayak Damodar Savarkar) त्यांच्या साहित्यातून निर्माण केलेला क्रांतिकारी विचारांपासून ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे कुसुमाग्रज (Kusumagraj). जे साहित्य आणि समाजाचे नाते मानतात.

ज्याचा संबंध जीवनाशी जोडतात तर कानेटकरांनी मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरूज्जीवन करून त्याला कलात्मक असे नवे स्वरूप दिले.

यासगळ्याच प्रतिबिंब असे की, हे सर्व होत असताना प्रेक्षक, वाचक, कलेची जाण, आवड असणार्‍या प्रत्येकजण त्याच्या लेखनाच्या साहित्याचा प्रेमात होता आणि ते साहित्यावरच प्रेम आजही कायम आहे.

हा सगळा साहित्याचा भरीव इतिहास, त्यांचा दर्जा याचा अभिमानाचा असला तरी तशा साहित्यकृती साकारणे, त्याच्या थोड फार जवळ पोहोचणे कदाचित हे विधान करण अतिशयोक्ती वाटेल, पण हे आजच्या आणि खासकरुन नाशिकच्या साहित्यिक, लेखकांकडून सक्षमतेने सांभाळले जात आहे.

कारण सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर यांच्या लिखाणाच्या, विचारांच्या धाटणीशी जरी आजच्या तरुण युवा पिढीची लेखन शैली साम्य बांधणारी नसली तरी त्यांच्याकडून निर्माण होत असलेले लेखन साहित्य समाज जीवनाशी, त्याच्या चढ, उतरांशी, संस्कृती परंपरांची कास धरणार असेच आहे आणि म्हणूनच त्यांची दखल राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणार्‍या पुस्करांच्या माध्यमातूनही ती घेतली जात आहे.

आज घडीला नाशिकच्या साहित्य लेखन क्षेत्रात दत्ता पाटील (Datta Patil), प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh), श्रीपाद देशपांडे (Shripad Deshpande), शंतनू चंद्रात्रे (Shantanu Chandratre), राजेंद्र उगले (Rajendra Ugle) यांच्यासह अनेक तरुण दिग्गज लेखक त्यांच्या पूर्ण ताकदीने वेगवेगळ्या विषयांना हात घालताना दिसतात.

जिथे गावाकडच्या पाण्याचा प्रश्नांची दाहकता दत्ता पाटील मांडता तेंव्हा दुसरीकडे प्राजक्त देशमुख आजचा तरुण वारकरी होत विठ्ठल डोळ्यासमोर उभा करतो. तेंव्हा अशा कलाकृतीचा गौरव केला जातो आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com