लाईट्स कॅमेरा ऍक्शन...नाशकात मालिकांच्या चित्रीकरणाची मुहूर्तमेढ

लाईट्स कॅमेरा ऍक्शन...नाशकात मालिकांच्या चित्रीकरणाची मुहूर्तमेढ


नाशिक | Nashik

लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी व्हॉइस देत आणि पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Dipak Pandey) यांनी क्लॅप देत नाशिकमध्ये (Nashik) मराठी मालिकांची (Marathi Serials) मुहूर्तमेढ रोवली गेली. करोनानंतर प्रथमच शहरात दूरचित्रवाणी वरील मालिकांच्या चित्रीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

कै दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) यांच्या भूमीत यापूर्वी चित्रपटांचे चित्रीकरण (Film Shooting) होत असायचे; मात्र, त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असे होते. नाशिकला मिळालेलं निसर्गसौंदर्य त्याचा यथोचित वापर करण्यासाठी दिग्दर्शक कलाकारांना (Artist) नाशिक खुणावू लागले आणि मध्यंतरी नाशिकच्या कलाकारांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेत आपल्या जिल्ह्यातील कलाकारांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, नाशिकची संस्कृती, वैभव जगासमोर यावे तसेच स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा याबाबत चर्चा केली.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी तत्काळ सर्व परवानग्याच्या रूपाने आपण मदत करू असे सकारात्मक आश्वासन दिले होते. यामध्ये पोलीस आयुक्त दीपक।पांडेय यांनी देखील आपण चित्रपट सृष्टी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.


आज (दि.२० ) रोजी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, राजेश पंडित, आदिनाथ ढाकणे, अभिनेता चिन्मय उदगीरकर (Actor Chinmay Udgirkar), हार्दिक जोशी, अभिनेत्री अमृता सुभाष, सचिन शिंदे, राहुल रायकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com