लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार

शरणपूर रोड येथील घटना
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार

नाशिक | Nashik

लग्नाचे अमिष दाखवून एकाने युवतीवर सातत्याने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली तसेच त्याने लग्नास नकार देत निघून गेल्याचा प्रकार शरणपूर रोडच्या बेथलेनगर परिरात घडला.

खेतन रवी तंगे (रा.बेथलेनगर, शरणपूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या

संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तंगे याने पिडतेशी ओळख वाढवून लग्नाचे अमिष देत २०१८ ते आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केले. यातून पिडीता गर्भवती राहिली असता तंगे याने लग्नास नकार दिला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक शेख करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com