मालेगाव | प्रतिनिधी

मालेगावी शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्याच्या दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शो ला मोठी झुंबड उडते. अशीच झुंबड मुंबई सागा चित्रपट पाहण्यासाठी मालेगावमध्ये उडाली होती. याठिकाणी एकही व्यक्तीच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे भान याठिकाणी दिसून आले नाही. यानंतर हा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे...

गेल्या काही दिवसांपूर्वी एका चित्रपटगृहात हिरोची एन्ट्री झाली आणि काही अतिउत्साही चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजीदेखील केली होती. यानंतर या चाहत्यांवर आणि थियेटर मालकांवर कारवाईची मागणी केली जात होती.

काल (दि १९) रोजी मालेगावातील मोहन चित्रपटगृहात 'मुंबई सागा' हा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडाली होती.

यावेळी बहुतांश प्रेक्षक विनामास्क होते. तसेच सुरक्षित अंतर राखण्याचे कुठलीही पालन न करता चित्रपटगृहात प्रवेश करण्यासाठी प्रेक्षकांनी कसरती केल्याचे दिसून आले.

नागरिकांच्या बेफिक्री मुळेच शहरात पुन्हा कोरनाचा उद्रेक पसरू लागला आहे. त्यामुळे या अशा नाहक गर्दी करणाऱ्या चाहत्यांना करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आवरण्याची गरज भासते आहे.