जानोरी । वार्ताहर Dindori / Janori

करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली नाशिक-मोहाडी शहर बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कुचंबणा होत असल्याने ती अडचण लक्षात घेऊन माजी जि. प. गटनेते प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नातून बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बस सेवा बंद झालेली होती. सध्या हळूहळू त्या करोनाच्या संकटातून मार्ग काढत जनता पूर्वपदावर येत असतांना सर्वसामान्य लोकांना ऐन दिवाळीत नाशिक साठी ये-जा करण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण तयार झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद गटनेते प्रविण जाधव यांनी नाशिक येथील वाहतूक व्यवस्था विभाग नियंत्रक नितीन मैंद यांना निवेदन देऊन जानोरी व मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने ही शहर बस सेवा चालू करावी अशी मागणी केली होती.

ती मागणी लक्षात घेऊन संबंधित अधिकार्यांनी शहर बस सेवा तात्काळ चालू करण्यात येईल असा शब्द दिलेला होता. त्याची पूर्तता होऊन नाशिक-मोहाडी शहर बस सेवा पुन्हा सुरुवात होऊन बस मोहाडी गावात पोहोचताच े सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले. ऐन गरजेच्यावेळी बस सेवा सुरू झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रमुख शहरांना जोडणार्या बस सेवा सुरू झाल्या असल्या तरी नाशिकहुन जानोरी-मोहाडी येथे येण्यासाठी अडचण तयार झाली होती. ती अडचण आता परिवहन शहरी बस सेवा सुरू झाल्याने दूर होणार आहे. परिसरातील नागरिकांनीही आपल्या नातेवाईकांना सांगून ह्या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बसचे मोहाडी गावात आगमन होताच सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त करत बसचे स्वागत केले. यावेळी वाहक व चालक या दोघांचाही परिसरातील नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प. गटनेते प्रवीण जाधव, सरपंच राजेंद्र जाधव, उपसरपंच बाबा निकम, बाकिराव मौले, प्रा.डॉ.विलास देशमुख, प्रा.कैलास कळमकर, अमोल देशमुख, पवन जाधव, गणपत जाधव , एल. टी. पाटील, नारायण थोरात, शिवनाथ थोरात आदी नागरिक उपस्थित होते.

मोहाडी व जानोरी गावातील ग्रामस्थांसाठी संबंधित विभागाच्या सहकार्याने बससेवा सुरू झाली आहे. मोहाडी व जानोरी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा. जेणेकरून ती बससेवा कायमस्वरूपी चालू राहील. त्याकरिता आपण परिवहन महामंडळास आवश्यक खबरदारी घेऊन सहकार्य करावे. -प्रवीण जाधव, माजी जि. प. गटनेते

नाशिकसाठी जाण्या-येण्याकरता बससेवा बंद झाल्याने परिसरातील सर्वसामान्य लोकांची कुचंबणा तयार झाली होती. ती अडचण दूर करण्यासाठी माजी जि. प. गटनेते प्रवीणनाना जाधव यांच्या प्रयत्नातून ती पुन्हा सुरू होत असून मी नागरिकांच्या वतीने प्रविण जाधव व परिवहन महामंडळाचे आभार मानतो. -गणेश तिडके, उपसरपंच, जानोरी