मोडीलिपी नामशेष होण्याच्या मार्गावर

मोडीलिपी नामशेष होण्याच्या मार्गावर

कळवण । प्रतिनिधी Kalwan

शिवकालीन पेशवेकालीन इतिहास मुळ ज्या लिपीत लिहिला प्राचीन दस्तऐवज (Ancient documents) संत साहित्य ज्या लिपीत खर्‍या अर्थाने बहरले ती मोडी लिपी (Modi Lipi) सध्याच्या काळात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

प्राथमिक शाळा (Elementary school) मध्ये जनरल राजिस्टरवर असलेल्या विद्यार्थ्यांची (students) या लिपीतील माहिती वाचणारे जिल्ह्यात एखाद्या दुसराच जाणकार राहिला असल्याचे आढळते. नव्या पिढीत या लिपीचे संवर्धन व संगोपन (Cultivation and care) होण्याबाबत कोणतीही उत्सुकता नसल्याचे दिवसेंदिवस उघड होत असल्याने ही लिपी मोडीत निघते की काय अशी भीती या लिपीचे जाणकार व्यक्त करीत आहे.

तेराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मोडी ही मराठी भाषेतील (Marathi language) लेखणीची लिपी होती. ही लिपी एकोणिसाव्या शतकापर्यंत सुरू होती मात्र 1920 नंतर देवनागरी लिपीचा वापर होऊ लागल्याने ती हळूहळू लेखनातून व शासकीय कामकाजातून हद्दपार झाली. परिणाम मोडी अवगत असणार्याची संख्या लक्षणीय रित्या घेतली. इतिहास संशोधनासाठी मोडीचे त्रोटक जाणकार राहिल्याने पोलीस ठाणे, महसूल, संग्रहालय, अन्य महत्ववाचे शासकीय कार्यक्रमांचे उपलब्ध असलेले असंख्य दस्तऐवज धूळ खात पडून आहे.

त्यामुळे ऐतिहासिक महत्वाचे संदर्भ पुरावे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय मठ मंदिराचा इतिहासही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे निजाम (nijam), टिपू सुलतान (tipu sultan), अहिल्याबाई होळकर (ahilyabai holkar) आदींचा मुळ इतिहासही मोडी लिपीत आहे. मोडी तज्ज्ञाची संख्या अल्प असल्याने घराण्याचा इतिहास बाहेर आलेला नाही. मोडी सांकेतिक लिपी असल्याने त्या काळी होत असलेले गुप्त व्यवहार, राजकीय डावपेच, युद्धाची रणनीती आदी बाबी तसेच साहित्य इतिहास कालीन पत्रे, पूर्वजांची मालमत्ता, खरेदीखत, दत्तक विधान, गहाण खत, ताम्रपत्र, पोलीस व न्यायालयाईन कागदपत्रे, पंचनामे आदी दस्तऐवज मोडी लिपीत आहे.

आजच्या पिढीकडे बघितले तर मोडी लिपीबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्याचप्रमाणे एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या स्थापना असलेल्या महाराष्ट्रा तील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती मोडी लिपीत लिहिलेली आहे या काळातील रजिस्टर हे याच लिपीत लिहलेली आढळतात. त्यामुळे या काळातील विद्यार्थी माहिती सदस्यांना पाहिजे असल्यास मोठया अडचणी निर्माण होत आहे. या लिपीचे तोडकेच ज्ञान असल्यामुळे ही माहिती मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.

या काळातील ही माहिती लिहिलेले कागदी 125 ते 150 वर्षांहून अधिक कालावधीचे झालेले असल्याने या कागदानेचे तुकडे पडून ही माहिती नाहीशी होण्याची भीती निर्माण झाली आहे. सतराव्या व अठराव्या शतकाच्या कालखंडात मोडी लिपी ही दरबारी लिपी म्हणून मान्य होती. बाराव्या शतकापासून ही लिपी व्यवहारात होती या काळा तील दस्तऐवज अजूनही राज्यातील इतिहास संशोधन केंद्रात आहे.

तथापि तिचे जाणकार नसल्याने हे दस्तऐवज ही इतिहास जमा होतात की काय असे वाटू लागले आहे. इतिहास संशोधन मंडळ आत हे दस्तऐवज मोठया प्रमाणात धूळखात पडून असून या लिपीचे जाणकार ही मोठया प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. म्हणून सद्य स्थितीत मोडी लिपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com