आधुनिक तंत्रामुळे शेतीला चालना : बागडे

व्दारकाधीश साखर कारखान्यात विविध प्रकल्पांची पाहणी
आधुनिक तंत्रामुळे शेतीला चालना : बागडे

सटाणा । प्रतिनिधी | Satana

द्वारकाधीश साखर कारखान्यातर्फे (Dwarkadhish Sugar Factory) उपपदार्थ निर्मितीसह सेंद्रिय शेतीस (Organic farming) प्रोत्साहनासाठी ऊस विकास व प्रकल्पांमध्ये 9Sugarcane Development and Projects) आधुनिक तंत्राची (Modern techniques) यशस्वी जोड देण्यात आल्यामुळे

परिसरातील शेती विकासाला चालना (agricultural development) मिळाल्याचे मत राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Former Speaker of State Legislative Assembly Haribhau Bagde) यांनी व्यक्त केले.

शेवरे, ता. बागलाण (baglan) येथील द्वारकाधीश करखान्याद्वारे पोटॅशयुक्त पावडर (Potash powder) निर्मिती व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाची (Organic Fertilizer Project) पहाणी करताना बागडे बोलत होते. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख (Vasantdada Sugar Institute Director General Shivajirao Deshmukh), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे चेअरमन बी.बी. ठोंबरे (West Indian Sugar Mills Association Chairman B.B. Thombare) यांनीही कारखान्याने इथेनॉल प्रकल्पातील (Ethanol project) पोटॅशची पावडर निर्मिती व सेंद्रिय खप्रकल्प, शासन धोरणांना सहकार्य म्हणून इथेनॉल निर्मिती,

कार्बन उत्सर्जन (Carbon emissions) थांबविण्यासाठी सी.ओ.2 प्रकल्प स्पेटवॉशची व्यवस्था (Arrangement of spatwash), खत निर्मितीसाठी स्पेटवॉश डायर, ऊस उत्पादकांसाठी सेंद्रिय शेती प्रसार व प्रचारासाठी खतनिर्मिती प्रकल्प उभारणी तसेच व्हीएसआय संस्थेचे मार्गदर्शन व संशोधीत संजीवकांचा वापर करून उपलब्ध प्रेसमेडपासून मोठ्या प्रमाणात खतनिर्मिती प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी उपस्थितांना द्वारकाधीशची प्रतिमा भेट देऊन, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपाध्यक्षा चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, अरुणकुमार भामरे, अनिल पिसे, ए.आर. सोनवणे, भूषण नांद्रे, बाळासाहेब करपे, विजय पगार, आहेर, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.

व्दारकाधीश कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितास प्राधान्य दिले आहे. आदिवासी, डोंगराळ व औद्योगिकदृष्ट्या मागास भागात कार्यरत असलेला द्वारकाधीश कारखाना बागलाण, कळवण, देवळा, मालेगाव, साक्री व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने ऊस विकासाचे कार्य स्वतंत्र कक्षाद्वारे करीत आहे. लवकरच ऊस उत्पादकांशी शिवार फेरीद्वारे संवाद कार्यक्रम आयोजित करणार आहोत. एकरी 100 मे.टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ऊस विकासास आवश्यक सर्व मालरूप अर्थसाह्य बिनव्याजी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यात येत आहे.

- शंकरराव सावंत, अध्यक्ष, व्दारकाधीश साखर कारखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com