नाशिक आयटीआय चा मॉडेल आराखडा

उद्योगांच्या करारात कामगारांना कौशल्याचे धडे
नाशिक आयटीआय चा मॉडेल आराखडा

नाशिक | Nashik

स्थानिक उद्योग धंद्यामध्ये (Local industry occupations) मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधुन (Industrial training institutes) देण्यात येणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाची गुणवत्तावाढ (Business training quality enhancement) करण्यासाठी व प्रशिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी केंद्र शासनाच्या मॉडल आयटीआय अंतर्गत राज्यातुन नाशिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सातपूर (Satpur) ला विकसित केले जात आहे. यात प्रशिक्षणार्थीं (Candidates) सोबत असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये व्यवसाय प्रशिक्षणातुन नव्या कौशल्यची भर टाकली जाणार आहे.

यासाठी साधारण ८.९९ कोटी रुपयांची मान्यता केंद्रशासनाकडुन (Central Government) देण्यात आली आहे.यात केद्र राज्य यांचा प्रत्येकी ७०:३० असा हिस्सा असेल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नामांकित उद्योजकांच्या अध्यक्षतेखाली सस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी IMC)ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत संस्थेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात २२४.७५ लाख निधी उपलब्ध :

यातील सिव्हील वर्क (Civil Work) २५ टक्के मध्ये कार्यशाळा (Workshop ) आणि संस्थेची इमारत यावर खर्च केला जाईल.

ट्रेड यंत्रणा आणि उपकरणे यांसाठी ५० टक्के खर्चात वेगवेगळ्या ट्रेड साठी ह्ड टूल, शॉप साहीत्य आणि उपकरणे यावर खर्च करण्यात येणार आहे.

यावितिरीक्तच्या यंत्रसामग्री आणि उपकरणे, फर्निचर, सोफ्टवेअर, आवर्ती खर्चांसाठी बाकी निधी वापरण्यात येईल.

महत्वाच्या बाबी

केंद्र, राज्य सरकार व उद्योजक यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करणे, कालबाह्य व्यवसाय बदलून त्याऐवजी आताच्या मागणीप्रमाणे आधुनिकीकरण करणे.

’आयएमसी’ च्या सल्ल्यानुसार रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, नवयंत्रसामग्री, प्रशिक्षण याद्वारे ’आयटीआय’ चा गुणात्मक दर्जा वाढविणे, उत्तम प्रशिक्षणार्थी घडविण्यासाठी निदेशकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणार्थीना नोकरी मिळवून देण्यासाठी ’टीसीपीसी’ सेलची स्थापना करणे..

’आयएमसी’ समिती

एकूण ११ सदस्यीय ’समितीत उद्योग क्षेत्रातील पाच, तर राज्याचे सहा सदस्य आहेत. यात उद्योजक सुधीर पाटील अध्यक्ष, तर सातपूर आयटीआयचे प्राचार्य राजेश मानकर सचिव आहेत. उद्योग क्षेत्रातून विनायक पाटील, चंद्रन नम्बैर, विजय निकुंभ, नंदकिशोर बोरसे यांचा समावेश आहे.

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी शैलेंद्र नलावडे, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पी. नाथे, गटनिदेशक प्रशांत बडगुजर, तर विद्यार्थी प्रतिनिधी संतोष पवार काम पाहतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com