नाशिकमधील मोडाळे पॅटर्नची होतेय सर्वदूर चर्चा; छत्रपती संभाजीराजेंनी केले कौतुक

नाशिकमधील मोडाळे पॅटर्नची होतेय सर्वदूर चर्चा; छत्रपती संभाजीराजेंनी केले कौतुक

जाकीर शेख | घोटी Zakir Shaikh Ghoti

महाराष्ट्राच्या नकाशावर कसे पोहचू असा निर्धार मोडाळे (Modale Village) गावाने केला आहे. पर्यटनाला ज्या सुविधा लागतात (Tourism Facility), त्या इथं उपलब्ध आहेत. गावात डोंगर, झाडी हिरवळ सर्व आहे. जोड आहे ती विकासाच्या गंगेची (Development of the rivers) ते काम इथे चांगले होत आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे सुसज्ज अभ्यासिकाचे लोकार्पण छत्रपती संभाजीराजे राजे (Chatrapati sambhajiraje bhosale) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते....

इतक्या छोट्याशा गावात पदार्पन केल्यानंतर इथल्या सुविधा या वाखारण्याजोग्या आहेत. तसेच आशिया खंडात (Asia continent) या गावाची ओळख निर्माण होईल. त्यामुळे शासकीय निधिवर अवलंबून न राहता प्रत्येकाने जिद्द ठेवून काम करायला पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, छावाचे प्रवक्ते करण गायकर, माजी आमदार शिवराम झोले, निमाचे धनंजय बेळे, जिल्हा नियोजन समितिचे सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, विनायक माळेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, रामदास धांडे, पी. के. ग्रुपचे प्रशांत कड्ड, सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच सिताबाई शेंडगे, अनिल गो-हे, सुनिल जाधव, हरीश्चद्र चव्हाण, अनिल भोपे, मदन कडु, नारायण वळकंदे, अरूण पोरजे, कैलास भगत, चेअरमन कचरु गो-हे, रघुनाथ बोडके, गजीराम शेंडगे, अशोक आहेर, ग्रामसेवक नाना खांडेकर हे उपस्थित होते.

मोडाळे गाव (Modale Village) हे अत्यंत दुर्लक्षित होते. गावात गेल्या दहा वर्षांपूर्वी कुठल्याही सुविधा नव्हत्या ग्रामपंचायातचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असून कर्मचाऱ्यांच्या पगारातच ते उत्पन्न निघून जाते. मात्र, आम्ही कमी कालावधीत गावात कोट्यवधी रुपयांचे विकासकामे केली असून दहावी ते बारावी पर्यत वर्ग या ठिकाणी सुरू केले.

तसेच परिसरातील पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अशी अभ्यासिका या ठिकाणी उभी असून भविष्यात या गावातील प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थी आय पी एस बनेल व उत्कृष्ठ अधिकारी बघायला मिळेल असे मनोगत त्यांनी गोरख बोडके (Gorakh Bodake) यावेळी व्यक्त केले.

मोडाळे गाव आगामी काही दिवसांत पूर्ण पणे सौरऊर्जा प्रकल्प या गावात करणार असल्याचे धनंजय बेळे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल गोऱ्हे, राहुल बोंबले, विठलं जगतात, ज्ञानेश्वर झोले, संजय धात्रक, किसन बोडके आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com