देवळालीगाव परिसरात ‘मॉकड्रील’

देवळालीगाव परिसरात ‘मॉकड्रील’

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊन दंगलीसारखे प्रकार घडू नये, यासाठी नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्यावतीने देवळालीगाव येथील राजवाडा परिसरात दंगा काबू अर्थात मॉकड्रील करण्यात आली.

पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस व उपनगर ठाण्याचे वपोनि सुरज बिजली व सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर ते दीडशे पोलीस या प्रात्यक्षिकांत सहभागी झाले होते.

देवळालीगाव येथील राजवाडा परिसरात अचानकपणे पोलिसांचा मोठा ताफा येऊन उभा राहिल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर काय प्रकार झाला म्हणून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

परंतु हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदरचे मॉकड्रिल भर रस्त्यावर असल्याने काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com