सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाच्या प्रांगणात सुरक्षा विभागाची सक्षमता तपासणीसाठी आपत्कालीन औद्योगिक सुरक्षा (मॉकड्रिल) घेण्यात आले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक माधव रत्नपारखे, नाशिक येथील जे. पी. एंटरप्राइजेसचे फायर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह गणेश सोनवणे व धनेश जाधव आणि कारखान्याचे अधिकारी, सेवक उपस्थित होते. यावेळी काम करताना सतर्क राहणे महत्त्वाचे असते.

सभोवतालची संपूर्ण माहिती घेणे, औद्योगिक सुरक्षाकवच वापरणे आणि अपघात टाळणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपसंचालक रत्नपारखे यांनी सांगितले.

कामगारांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करतानाच कामगारांना नेहमी सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना अद्ययावत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे सांगून कामगारांच्या ज्ञानाची कसोट या मॉकड्रीलच्या माध्यमातून दिसून येत असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले.

यावेळी गणेश सोनवणे व धनेश जाधव यांनी फायर हन्टिंगशर व लहान मोठे अपघात कसे टाळावेत, याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले. कारखान्याचे संपर्क अधिकारी प्रवीण जाधव यांनी सूत्रसंचलन केले.