पोलिसांकडून दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम

पोलिसांकडून दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम

नवीन नाशिक | प्रतिनिधी

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव ( Ganesh Festival ) अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याच्या ( Ambad Police Station )हद्दीत सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांच्या पर्यवेक्षणात पाथर्डी फाटा ( Pathardi Phata ) येथे दंगा काबू योजना ( riot control plan ) रंगीत तालीम घेण्यात आली.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता व काहीही कारणांवरून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस दल कशाप्रकारे तत्पर आहे हे दाखवण्याकरिता पाथर्डी फाटा येथे पोलीस फाटा व आंदोलक असा देखावा करून दंगलीवर नियंत्रण कसे मिळवावे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख,इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वपोनी संजय बांबळे,सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश घोटेकर,अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदन बागडे,पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर,

सपोनी गणेश शिंदे,सपोनी किशोर कोल्हे,सपोनी वसंत खतेले,उपनिरीक्षक संदीप पवार,किरण शेवाळे,अंमलदार प्रशांत नागरे,योगेश शिरसाठ,तुषार देसले,किरण सोनवणे,सचिन करंजे,सचिन जाधव,हेमंत आहेर आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार ,आरसीपी प्लाटून उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com