सामूहिक अत्याचाराप्रकरणी संघटीत टोळीस 'मोक्का'

सामूहिक अत्याचाराप्रकरणी संघटीत टोळीस 'मोक्का'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या (Nashikroad Police Station) हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang rape) केल्याप्रकरणी संशयितांना मोक्का लावण्यास अप्पर पोलीस महासंचालक (Additional Director General of Police) यांनी शिक्कामोर्तब केले...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 10 जानेवारी 2021 रोजी पूजा वाघ (Pooja Wagh) (२७, रा. अरिंगळे मळा, काळी चौक, एकलहरा रोड, नाशिकरोड) हिने अल्पवयीन पीडित मुलीला तिच्या घरातून बळजबरीने घेऊन जाऊन स्वतःच्या घरात आणत दरवाजा बाहेरून बंद करून घेतला.

पूजासोबत घरात असणारे संशयित सुनिल निंबाजी कोळे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार आकाश राजेंद्र गायकवाड (२२, रा. रेल्वे स्ट्रॅक्शन एकलहरा रोड, नाशिकरोड), रवि उर्फ फॅन्ड्री संतोष कुन्हाडे (१९, रा. मुक्तीधामच्या पाठीमागे, उपनगर, नाशिक), दीपक समाधान खरात, (१९, रा. मनपा शाळेच्या पाठीमागे, सिन्नर फाटा, नाशिकरोड), सोमनाथ उर्फ सोम्या विनय खरात, (१९, रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी अल्पवयीन पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार केले.

याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी एप्रिलमध्ये सदर संशयितांवर मोक्का दाखल करण्याकरिता अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे अहवाल सादर केला होता.

त्यानुसार अपर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सदर गुन्ह्यातील सर्व संशयितांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यास शिक्कामोर्तब केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com