
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे २० मोबाईल गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकल असा २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवेन्द्र कुमार दिनेश कुमार अहिरराव (३३, व्यवसाय- मजुरी रा- हल्ली मु उत्सव हॉटेलच्या मागे, दातीर वाडा, नाशिक मुळ रा- रोहाउस नं १७, कंचनपुर जि दिंडोरी राज्य मध्यप्रदेश ) यांचा (दि. २० मार्च) मोबाईल डेल्टा मॅग्नेट कंपनी अंबड येथे कामावर पायी जात असतांना लिअर कंपनी अंबडच्या समोर फोनवर बोलत असतांना पाठीमागुन आलेल्या एका काळ्या रंगाची मोपेड अॅक्टीवा सारख्या गाडीवर बसलेल्या अनोळखी ३ व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने खेचून पलायन केले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले करत असतांना गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक किरण गायकवाड यांना काही अनोळखी व्यक्ती हे त्यांच्याकडील चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी प्रणय स्टॅम्पींग कंपनी अंबड येथे येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळालीयावरून .गुन्हे शोध पथकाचे सपोनि वसंत खतेले, अंमलदार जनार्धन ढाकणे, राकेश राउत, सचिन करंजे,सुधीर आव्हाड, तुषार देसले, प्रविण राठोड, शिंदे ,अनिल ढेरंगे,
दिपक जगताप, संदिप भुरे,घनशाम भोये, यांनी सापळा रचून संशयित राहुन संपत जायभावे (२१, रा. मोरवाडी गाव नवीन नाशिक, कृष्णा सुभाष सानप, (१९, रा. दत्तमंदिरासमोर मोरवाडी गाव नवीन नाशिक) ,शुभम भाउसाहेब ईप्पर (२०, रा. मोरवाडी गाव ,नवीन नाशिक) यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे २० मोबाईल गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकल असा २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वसंत खतेले,पोलीस शिपाई अनिल ढेरंगे करत आहेत.