चोरीच्या दुचांंकीसह मोबाईल जप्त

चोरीच्या दुचांंकीसह मोबाईल जप्त

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलिसांनी ( Ambad Police Station )दोन भामट्यांना सापळा रचत अटक करून त्यांच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकल( Motorcycle ) व दोन मोबाईल ( Mobile ) असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.३मे)रात्री आठ वाजेच्या सुमारास थापाजी चायनीज समोर माणिक नगर भाजी मार्केट समोर,मयुरी अपार्टमेंट गाळ्यासमोर संदीप सरबजीत थापा ( २८,रा. रवीराज अपार्टमेंट रूम नंबर ११,रथचक्र चौक,इंदिरानगर )यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख,पोलीस निरीक्षक नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे करत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंमलदार मुकेश गांगुर्डे,तुळशीराम जाधव,संदीप भुरे,कुणाल राठोड,किरण सोनवणे,किरण गायकवाड,हेमंत आहेर,जनार्धन ढाकणे,मच्छिंद्र वाकचौरे,राकेश राऊत,मोतीराम वाघ,प्रशांत नागरे,नितीन सानप यांनी हद्दीत सापळा रचला.

संशयित संदीप समाधान गवई (१९,रा.मटाले चाळ,मनपा शाळेजवळ,बंदावणे नगर,कामटवाडा,नाशिक ),दर्शन नागो निकम (२२,रा. जोगेश्वरी अपार्टमेंट,उत्तम नगर,मांडे मळा,नाशिक ) यांना अटक करत त्यांच्याकडून दोन चोरीचे मोबाईल सह अंबड,मुंबईनाका ,गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटारसायकल असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल बनतोडे,ज्ञानेश्वर कातकाडे करत आहेत.

Related Stories

No stories found.