
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात अलीकडे मोबाईल चोरीच्या (Mobile theft) घटनांमध्ये वाढ झाली असताना, पोलिसांनी एका टोळीला ताब्यात घेतले आहे. पायी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या माहिला, पुरुष आणि मुलांना लक्ष्य करत त्यांचे मोबाईल खेचून पोबारा करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-1 (Crime Branch Unit-1) च्या पथकाने जेरबंद केली आहे.
या टोळीने शहर व परिसरात 22 मोबाईल खेचल्याची कबूली दिली असून संशयितांकडून 4 लाख 53 हजारांचे मोबाईल जप्त केले. संशयित आरोपी हे कॉलेज मध्ये शिक्षण (Education) घेत असुन मौजमजा करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांनी हे गुन्हे केले असल्याचे दिसून आले आहे.
दि. 4 फेब्रुवारी रोजी रोजी, रात्री अकरा वाजेच्या सुमारास अनोळखी तीन इसमांनी मोटार सायकलवर येवुन मॅग्नम हॉस्पीटल (Magnum Hospital) समोर रोडवर, कॅनडा कॉर्नर, गंगापुररोड, नाशिक येथुन मोबाईल फोनवर बोलत पायी जाणाऱ्या एकाचा मोबाईल फोन बळजबरीने ओढुन चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरात मोबाईल खेचून चोरी करणा-या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट १ चे महेश सांळुके यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी चेतन निंबा परदेशी (रा. शांतीनगर, नवीन नाशिक), शशीकांत सुरेश अंभोरे (रा. पोर्णिमा बसस्टॉप शेजारी, नाशिक), विजय सुरेंद्र श्रीवास्तव (रा. जुने सिडको, नवीन नाशिक) यांना ताब्यात घेतले.
पोउनि विष्णु उगले, रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, प्रविण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदिप भांड, महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांच्या पथकाने शिताफीने या टोळीला ताब्यात घेतले.
संशयित आरोपींकडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले २२ मोबाईल हॅण्डसेट व गुन्हा करतांना वापरलेली इग्नायटर मोटार सायकल (Igniter Motorcycle) असा एकुण ४,५३,००० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.