लहान मुलांसाठी मोबाईल ठरतोय घातक

लहान मुलांसाठी मोबाईल ठरतोय घातक

कोठुरे। वार्ताहर Kothure-Niphad

दिवसेंदिवस सर्वांना मोबाईलची (mobile) आवड निर्माण होताना दिसत आहे. ज्याप्रमाणे मोठे तासन्तास मोबाईल वर असतात. त्याचप्रमाणे आता लहान मुलेही (Children) जास्त वेळे मोबाईल मध्ये गेम्स (mobile games) खेळताना दिसून येत आहेत.

पुर्वी हा प्रकार शहरात जास्त प्रमाणात चालत होता. परंतु आता ग्रामिण भागात सुद्धा गेम्सचा विळखा पडला आहे. सततच्या गेम्समुळे लहान मुलांमध्ये हिसंक प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. यासह मैदानी खेळ बंद झाल्यामुळे याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर (health) होतांना दिसत आहे. आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसून येत आहे.

याचा वापर जेवढा चांगल्या गोष्टीसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टीसाठी सुद्धा होत आहे. सध्या मोबाईल मध्ये अनेक गेम्स सहज उपलब्ध होत आहे. यामध्ये पबजी गेम्स (Pubji Games) सारखे हानीकारक गेम्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. हेच गेम्स मोबाईल मध्ये डाऊनलोड (Download) करुन लहान मुले तासन्तास मोबाईलवर खेळताना दिसून येत आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

याचाच परिणाम शाळेमध्ये (shcools) किरकोळ कारणावरुन मोठमोठी भांडणे होताना दिसत आहेत. लहान वयात मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण झाल्यामुळे त्यांचे अभ्यासात मन रमण नाही व ज्या वेळेस पालकांकडून अभ्यास करण्याचे सांगितले जात त्यावेळी मुलांमध्ये चिडचिड वाढते. यामुळे सर्व प्रथम पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना कमी प्रमाणात मोबाईल देण्याची गरज आहे.

12 वर्षा खालील मुलांना मोबाईल देणे डोळ्यासाठी घातक आहे. मोबाईल न देता मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहान देणे. दिवसातून तीन चार वेळेस थंड पाण्याने डोळ्यावर पाणी मारावे. टिव्ही व संगणकाचा वापर करु देऊ नये. लहान मुलांमध्ये टिव्ही व मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तासन्तास टिव्ही व मोबाईलचा वापर होत असल्यामुळे याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावर जास्त प्रमाणात होत आहे.

यामुळे लहान वयात मुलांना नंबर लागण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या माहितीनुसार वाढतांना दिसत आहे. तसेच मुलांच्या भविष्यात बौद्धीक क्षमतेवर यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना मोबाईलची सवय लावू नये असेही कोठुरे विकास सोसायटीचे चेअरमन मोतीराम मोगल यांनी म्हटले आहे.

मोबाईल गेम्स मुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष सध्या पालकांकडून लहान मुलांना नादी लावण्यासाठी किंवा मुलांनी जेवण करण्यासाठी मोबाईल देण्याचे प्रमाण जास्त आहे. यात विशेष म्हणजे काही पालकांनी तर आठ वर्षांच्या मुलांनाच टॅब घेऊन दिलेले आहेत. यामुळे शाळकरी मुले, अभ्यास सोडून मोबाईलवर गेम्स खेळतांना दिसत आहेत व या सर्व प्रकाराकडे पालक दुर्लक्ष करत असल्यामुळे याचा परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पालकांनी वेळेतच मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रकाश मोगल (विद्यार्थी पालक)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com