टोळक्याचा तरुणावर हल्ला

टोळक्याचा तरुणावर हल्ला

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

अंडारोलची ऑर्डर उशिरा दिल्याचा राग आल्याने ६ ते ७ जणांच्या टोळक्याने अंडारोल गाडीच्या मालकाच्या डोक्यात दगड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon police station) गुन्हा दाखल (case registered) करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य तानाजी लभडे (Ajinkya Tanaji Labhade) (२६,रा.लोकधारा सोसायटी कोणार्क नगर आडगाव ) याची जत्रा हॉटेल (Jatra Hotel) समोर अंडारोलची गाडी आहे. (दि.३०) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित गट्ट्या (पुर्ण नाव माहित नाही) व त्याचे २ मित्र आणि एक मैत्रीण अंडारोलच्या गाडीवर अंडारोल खाण्यासाठी आले होते.

यावेळी अजिंक्य याने ऑर्डर उशिरा का देतो अशी विचारणा करत त्याचा राग आल्याने गट्ट्या याने त्याचा मित्र सुशांत नाठे (Sushant Nathe) याला फोन करून त्याचे सहा ते सात साथीदार सोबत बोलवून नाठे याने अजिंक्यच्या डोक्यात दगड (Stone) टाकून लोखंडी रॉड (Iron rod) व बांबूने त्याला जबर मारहाण (Violent beating) केली.

दरम्यान, यावेळी संशयितांनी (एम एच १५ ई बी ८३४९) या वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच पोलीस आयुक्तांच्या (Police Commissioner) मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी इरफान शेख (Irfan Sheikh) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत तोडकर (Hemant Todkar) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com