गॅस पाईपलाईन काम बंद पाडण्याचा मनसेनेचा इशारा

गॅस पाईपलाईन काम बंद पाडण्याचा मनसेनेचा इशारा

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकरोडसह शहरात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण त्वरित न केल्यास आंदोलन करण्याचा व पाईपलाईनचे काम बंद पाडण्याचा इशारा मनसेनेने दिला आहे. याबाबत मनसेने महापालिकेचे नाशिकरोड विभागीय अधिकारी संजय गोसावी यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा- नाशिकरोडला गॅस पाइपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्व रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. नागरिकच घरासमोरील खड्डे बुजवू लागले आहेत. प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. काम करत असताना नियोजन केलेले नाही. संपूर्ण रस्त्यामध्ये मातीचा खच असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखल होऊन अपघात होत आहेत. प्रशासनाने त्वरित ते खड्डे बुजवुन त्यावर खडीकरण व डांबरीकरण करणे अपेक्षित होते. पण अजून एकाही ठिकाणी हे काम झालेले नाही.

पावसाळ्यात या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनेक गाड्या त्यात फसून,पडून नुकसान होणार आहे. दोन दिवसांच्या वादळी पावसात या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर माती असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. तो चिखल लोकांच्या घरापर्यंत पोहचून रोगराईला निमंत्रण मिळणार आहे.

लॉकडाउनचा फायदा घेत महापालिकेने पुढील 15 दिवसात हे काम करावे. पावसाळी नाल्यांची साफसफाई करावी. अन्यथा मनसे हे काम बंद पाडेल. यावेळी विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रदेश कामगार चिटणीस बंटी कोरडे, पूर्व विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, विनायक पगारे, संजय हांडोरे, नितीन पंडित, नितीन धनापुणे, बाजीराव मते, शशी चौधरी, उमेश भोई, चेतन माळवे, सागर दाणी, मयूर रत्नपारखी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com