नांदगाव : वीज बिल माफ न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा
नांदगाव : विजबील माफ न केल्यास मनसेचा आंदोलनचा इशारा
नाशिक

नांदगाव : वीज बिल माफ न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Sanjay More

Sanjay More

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

करोनाच्या संसर्ग विषाणुमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने केल्या गेलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे उत्पादनाचे साधने बंद असताना या दरम्यान विज महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले जाईल असे भरमसाट वीज बिल पाठवून त्यांची एकप्रकारे थट्टाच केली गेली असून सदर बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे तर्फे करण्यात आली आहे.

येथील उप अभियंता महाविरण कंपनी शाखा नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात कोवीड-१९ मुळे सर्वसामान्य व्यवसायिकांचे व्यवसाय बंद होते

अशा व्यवसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना पाठविलेले सरासरी बिले हे अन्यायकारक असून ते माफ करण्यात यावे, अन्यथा वीज ग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात येवून खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसे तालुकाप्रमुख दिपक म्हस्के, शहरप्रमुख प्रदिप थोरात, सरचिटणीस डाॅ. यशवंत गायकवाड यांनी निवेदनात दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com