गाव तेथे मनसेची शाखा, तेथे नाका निर्माण केली जाणार - किशोर शिंदे

मनसेची नाशिक लोकसभा मतदारसंघ व विधानसभा निहाय इगतपुरी मतदारसंघ आढावा बैठक
गाव तेथे मनसेची शाखा, तेथे नाका निर्माण केली जाणार - किशोर शिंदे

घोटी | प्रतिनिधी

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी आम्हाला भरगोस मतदान केलेले आहे. शहरात पक्ष वाढवणे सोपे आहे मात्र ग्रामीण भागात पक्ष वाढवणे कठीण असते मात्र इगतपुरी तालुक्यातील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे इगतपुरी मतदार संघात मनसेला सर्वात जास्त मतदान झाल्याचे दिसून येते. हाच आनंद घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

आगामी निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडुण येतील यासाठी गाव तेथे मनसेची शाखा तेथे नाका निर्माण केली जाणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक लोकसभा संघटक किशोर शिंदे यांनी केले. जालना जिल्ह्यात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली हे कृत्य निषेधार्थ असुन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी या आढावा बैठकीत केली.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघ व विधानसभा निहाय इगतपुरी मतदारसंघ आढावा बैठक घोटी येथे संपन्न झाली त्या प्रसंगी किशोर शिंदे बोलत होते.

या आढावा बैठकीत पुण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, पक्ष निरीक्षक गणेश सातपुते जिल्हा प्रमुख अंकुश पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे, मनसेचे माजी नगरसेवक सलिम मामा शेख, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, रतनकुमार इचम, माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपिठावर जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष रामदास आडोळे, विद्यार्थी सेनेचे संदीप भवर, माजी तालुकाध्यक्ष मुलचंद भगत, प्रताप जाखेरे, गणेश उगले, मनोज गोवर्धने, नागेश गायकर, भोलेनाथ चव्हाण, महिला आघाडी प्रमुख पुनम राखेचा, डॉ. युनुस रंगरेज, निलेश राखेचा, संदीप शेलार, राजु राखेचा, हसन आगविले जनार्दन गतीर, प्रभाकर हंबीर, अमृता हबीर,

तसेच, निलेश बुधवारे, रामदास गांगड, निलेश जोशी, अविनाश कडु, मिलींद कांबळे, भाऊसाहेब निमसे, अभिजीत गोसावी, गौरी सोनार, इम्रान सैयद, आकाश तोकडे, जावेद शेख, उपस्थित होते. यावेळी कावनईचे माजी सरपंच नंदु पाडेकर, पोपट जाधव यांनी मनसेत प्रवेश केला. या आढावा बैठकीला मन सैनिकांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याने मनसेच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसुन आले. सुत्र संचालन प्रताप जाखेरे यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com