मनसेनेची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणार

मनसेनेची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणार

नाशिक । फारूख पठाण Nashik

नाशिक महापालिका निवडणूक NMC Upcoming Elections जसजशी जवळ येत आहे तशा पद्धतीने राजकीय पक्षांच्या हालचालीदेखील गतिमान होत आहेत. 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या काळात मनपात सत्तेत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील Maharashtra Navnirman Sena आता पुन्हा सत्ता खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्या 31 प्रभागांमध्ये स्वतंत्र मेळावे घेऊन लोकांपर्यंत सत्ताकाळात झालेली विकासकामे Devlopment works पोहोचवण्यावर भर देणार आहे.

मनसेना व भाजपशी युतीचा सर्व अधिकार पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आहे. तरी स्थानिक पातळीवर पूर्ण 133 जागी आपले उमेदवार उभे करण्याची तयारी स्थानिक पदाधिकारी करत आहेत. 40 वरून 2017 च्या निवडणुकीत फक्त पाच नगरसेवक राहिल्याने मनसेनेने आगामी 2022 ची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. मागच्या वेळी मनसेनेच्या एकूण उमेदवारांना सुमारे तीन लाख मते मिळाली होती. तर 17 उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिले होते. यातील काही उमेदवार फक्त शेकडो मतांनी पराभूत झाले होते.

यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्याही प्रकारची कमी न ठेवता सर्व शक्तीनिशी मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुणांना अधिक संधी मिळणार असल्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याने तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसत आहे. पक्षाचे तरुणांसह ज्येष्ठ नेते सध्या सोशल मीडियावर फुल्ल अ‍ॅक्टिव्ह दिसत आहेत. मध्यंतरी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शहरात नव्याने 122 शाखाप्रमुखांची नेमणूक करून त्यांच्या घरी पक्षाचा झेंडा लावण्याचे कार्यक्रम घेऊन वातावरणत निर्मिती करण्यात आली. तर महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहरात नुकतीच भव्य सायकल रॅली काढण्यात आली. यामुळे सामान्यांमध्ये जाऊन त्यांचे मुद्दे उपस्थित करून त्यांना खूश करण्याचे प्रयत्न होत आहेत.

2017 मध्ये पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला होता. 2017 साली भाजपची मनपावर एकहती सत्ता आली, मात्र त्यांनी पहिजे तसे काम केले नाही. तर ठेकेदारांना पोसण्याचे काम केल्याचा आरोप होत आहे. मध्यंतरी मनपाचे शहरातील मोक्याचे भूखंडदेखील बीओटी तत्त्वावर मोठ्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा आरोपदेखील सत्ताधारी भाजपवर विरोधकांनी लावला आहे. यामुळे मनसेना सत्ताकाळातील 2012 ते 2017 याकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होता शहराचा झालेला चौफेर विकास विरुद्ध इतर पक्षांच्या सत्ताकाळात झालेला भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार तसेच शहराचा न झालेल विकास हे मुद्दे घेऊन मनसेना आगामी मनपा निवडणुकीत उतरणार असल्याचे नेते सांगतात.

पदाधिकार्‍यांमध्ये बदल

आगामी नाशिक महापालिका निवडणूक लक्षात घेऊन पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांमध्ये मोठे फेरबदल केले. विशेष म्हणजे नगरसेवक असताना नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येऊन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणारे दिलीप दातीर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून शहराध्यक्ष केले तर शहराध्यक्ष म्हणून अत्यंत चमकदार कामगिरी करणारे अंकुश पवार यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केली. त्याचप्रमाणे प्रदेश पातळीवरदेखील अनेक बदल करण्यात आले. या बदलांमुळे काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com