नायलॉन मांजा विरोधात मनसेनेचा एल्गार

नायलॉन मांजा विरोधात मनसेनेचा एल्गार

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

बंदी (ban) असलेल्या घातक नायलॉन मांज्याची (Nylon Manja) छुप्या पद्धतीने विक्री सुरु असून या मांज्यामुळे अनेक दुचाकी स्वार तसेच रस्त्यांवरून जाणारे नागरिक जखमी होत आहे.

या पूर्वीही नायलॉन मांज्यामुळे (Nylon Manja) अनेक दुचाकीस्वारांना गळा चिरल्यामुळे गंभीर दुखापत झाली असून नायलॉन मांज्यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर तात्काळ कडक कारवाई (action) करून अशा अनिष्ठ प्रवूत्तीस तात्काळ पायबंद घालण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) पोलीस उपायुक्तांना निवेदाद्वारे (memorandum) करण्यात आली आहे.

प्रशासनातर्फे दर वर्षी मकर संक्रांतीच्या (makar sankrant) काळात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येते. मात्र छुप्या स्वरुपात नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन नागरिक व निष्पाप पक्षी या घातक मांज्यामुळे जखमी होत आहे. मनसेना तर्फे नागरिकांमध्ये नायलॉन मांजाची उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती उघड करून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, असे निवेदनात (memorandum) म्हटले आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी महापौरअशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप दातीर, ज्येष्ठ माजी नगरसेवक सलिम शेख, मनोज घोडके, प्रमोद साखरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, महिला विभाग शहराध्यक्ष अरुणा पाटील, शैला शिरसाठ, मुक्ताताई इंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com