
नाशिक | Nashik
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने ठाकरे गटाला (Thackeray group) मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता ठाकरे गट नाशकात मनसेला मोठे खिंडार पाडणार असल्याचे समजते.
नाशिकमधील मनसेच्या (MNS) २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली असून हे सर्व कार्यकर्ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.