आ. सीमा हिरेंना नारीशक्ती पुरस्कार

आ. सीमा हिरेंना नारीशक्ती पुरस्कार

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

मुंबई येथे दादासाहेब फाळके आयकॉन ॲवार्ड फिल्म ऑर्गनायझेशन (Dadasaheb Phalke Icon Award Film Organization) यांच्यातर्फे आ. सीमा हिरे (Seema hire) यांना नारीशक्ती पुरस्कार (Nari Shakti Award) देऊन सन्मानित करण्यात आले...

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशन मुंबईच्या वतीने सामाजिक, राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रातील महिलांना नारीशक्ती पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

तसेच पुरुषांना संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार या नावाने पुरस्कार दिला जातो. आ. सीमा हिरे यांच्यासोबत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, राजस्थानच्या आ. दीप्ती किरण माहेश्वरी, रुपल कुमारी चौधरी यांनादेखील पुरस्कार देण्यात आला.

लातूरचे खा. सुनील गायकवाड यांना छत्रपती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई विमानतळावरील ऑर्चिड हॉटेल येथे या पुरस्काराचे वितरण झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com