
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajeet Tambe) उद्या दिंडोरी तालुका (Dindori Taluka) दौऱ्यावर येत असून दिंडोरी, वणी, खेडगाव, कादवा कारखाना अशा अनेक ठिकाणी ते भेटी देऊन मतदारांचे आभार मानणार आहेत...
आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबे यांचा हा पहिलाच दिंडोरी दौरा असून विधान परिषदेतील एक युवा व अभ्यासु आमदार (MLA) म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठीआमदार सत्यजीत तांबे प्रयत्नशील असून दिंडोरी दौऱ्यात (Dindori Tour) ते शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील तसेच युवा शेतकर्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.